डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित प्रश्नोउत्तरे

थोर समाज सुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित काही प्रश्नोउत्तरे आपण जाणून घेणार आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित प्रश्नोउत्तरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित प्रश्नोउत्तरे

बाबासाहेबांशी संबंधित खालील प्रश्न इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर विचारले जातात, त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

Questions and answers related to Dr Ambedkar

 

1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ कोणते आहे ?

उत्तर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू आहे. महू या गावाचे नाव ‘डॉ. आंबेडकर नगर’ करण्यात आला आहे.

 

2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते आहे ?

उत्तर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे होते.

 

3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय आहे ?

उत्तर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव ‘भीमराव रामजी आंबेडकर’ होते.

 

4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण कोणत्या खंडांमध्ये झाले ?

उत्तर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण आशिया अमेरिका अणि यूरोप या खंडांमध्ये झाले.

 

5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण कोणत्या शैक्षणिक संस्थांमध्ये झाले ?

उत्तर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन शैक्षणिक संस्थांमध्ये झाले.

 

6. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला ?

उत्तर – 14 एप्रिल 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू येथे झाला.

 

7. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

उत्तर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रमाबाई आणि दुसऱ्या पत्नीचे नाव सविता होते.

 

8. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?

उत्तर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रमाबाई आंबेडकर होते.

 

9. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते ?

उत्तर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमाबाई होते.

 

10. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या जातीचे होते ?

उत्तर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महार जातीचे होते. महार समाज हा अनुसूचित जातीमध्ये (SC) गणला जातो.

 

11. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन कोठे झाले ?

उत्तर – 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन दिल्ली येथे झाले.

 

12. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक उपाधी सांगा.

उत्तर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ‘महामानव’ ही उपाधी सर्वात प्रमुख आहे.

 

13. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किती रुपयांची थैली देण्यात आली ?

उत्तर – 5 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई मुन्सिपल कामगारांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 2001 रुपयांची थैली देण्यात आली होती.

 

14. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले आणि श्रेष्ठ गुरु कोण होते?

उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले आणि श्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध होते.

 

15. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाला गुरुस्थानी मानले?

उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानले.

 

16. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाला ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ संबोधले आहे?

उत्तर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांना सर्वश्रेष्ठ भारतीय संबोधले आहे.

 

17. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणते वाद्य वाजवायला शिकले होते?

उत्तर – आयुष्याच्या उत्तरार्धात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्हायोलिन वाद्य वाजवायला शिकले होते.

 

18. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण कोणत्या भाषांमध्ये असे?

उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजराती या चार भाषांमध्ये भाषण केलेले आहे.


 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नव-नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी उजवीकडील खालील बाजूस असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published.