लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सुविचार

साहित्यरत्न व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे 20 अनमोल सुविचार, जे आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. – Anna Bhau Sathe Quotes

Anna Bhau Sathe Quotes – अण्णा भाऊ साठे यांचे सुविचार

अण्णा भाऊ साठे (1 ऑगस्ट 1920 — 18 जुलै 1969) हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. ते मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचारांचे होते.

अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. मराठी विकिपीडिया वरील टॉप 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांचे सुद्धा नाव आहे.

 

अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली. त्यांचे प्रेरणादायी विचार सुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांचे वीस अनमोल विचार जाणून घेऊया… Annabhau Sathe Quotes In Marathi

 

अण्णा भाऊ साठे यांचे सुविचार – Anna Bhau Sathe Quotes

1. तुम्ही गुलाम नाही आहात, तर तुम्ही या वास्तव जगाचे निर्माणकर्ता आहात.

2. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे.

3. जात हे वास्तव आहे. गरीबी ही कृत्रिम आहे. गरीबी नष्ट करता येऊ शकते, पण जात नष्ट करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे.

4. आजचे साहित्य आरशासारखे स्वच्छ असावे. त्यात आपले प्रतिबिंब स्पष्ट असावे, एवढीच त्याची मागणी आहे. आपला चेहरा आहे तसा दिसावा, असे वाटणे गैर नाही.

5. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो.

 

6. प्रतिभेला सत्याचे, जीवनाचे दर्शन नसेल तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत. सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधकारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. मग कितीही प्रयत्न करून त्यात प्रतिबिंब दिसत नाही आणि कल्पकता निर्मळ ठरते.

7. केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसते. हे सत्य हृदयात मिळवावे लागते‌. डोळ्यांना सर्वच दिसते परंतु ते सर्व साहित्याला हात देत नाही. उलट दगा मात्र देते.

8. दलितांचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाजराप्रमाणे असते. ते जवळ जाऊन पहा. कारण “जावे ज्यांच्या वंशा, तेव्हा कळे” हे तुकारामांचे म्हणणे खोटे नाही.

9. आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे. आम्हाला मांगल्ये हवे आहे. आम्हाला मराठी साहित्याच्या परंपरेचा अभिमान आहे, कारण मराठी साहित्याची नांदी आमच्याच जीवन संघर्षाने झडली आहे.

10. जग बदल घालुनी घाव, मज सांगून गेले भीमराव.

 

11. मुंबईत उंचावरी, मलबार हिल इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, परळात राहणारे, रात दिवस राबणारे, मिळेल ते खाऊन घाम गाळती.

12. मी जे जीवन जगतो, जगत आहे आणि जे मी अनुभवले आहे, तेच मी लिहितो. माझी माणसे मला कुठे ना कुठे भेटलेली असतात. त्यांचे जगणे, मरणे मला ठाऊक असते.

13. दलितांतही सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात. पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो. कारण तो हाडामासाचा केवळ गोळा नसतो. तो निर्मितीक्षम असतो. तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर रचतो.

14. माझा माझ्या देशावर, जनतेवर आणि त्यांच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी, समृद्ध आणि सभ्य व्हावा, येथे समानता नांदावी, या महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे, अशी मला रोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पहात पहात मी लिहीत असतो.

15. जो कलावंत जनतेची कदर करतो, त्याचीच कदर जनता करते. हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो.

16. नैराश्य हे धारदार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते.

17. जनतेकडे पाठ फिरवणाऱ्याकडे साहित्यही पाठ फिरवीत असते. जगातील सर्वश्रेष्ठ कलाकारांनी वाङमय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे आणि तो डोळा सदैव पुढे आणि जनतेबरोबर असणे जरुरी आहे.

18. कला ही नेहमी गरिबाच्या झोपडीत जन्माला येते, महालात जन्माला येतात ती गरिबाचे रक्त पिणारी ढेकणं.

19. अनिष्ठ धर्माच्या आचरणाने माणसांना हीन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे.

20. माणुसकी पळाली पार, होऊनी बेजार, पंजाबातून; सूडाची निशा चढून, लोक पशुहून, बनले हैवान.

Annabhau Sathe Quotes In Marathi

 

सारांश

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे सुविचार (Anna Bhau Sathe Quotes) याविषयीचा हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला जरूर कळवा. हे अनमोल सुचिवार इतरांपर्यंत सुद्धा शेअर करा.

याशिवाय तुमच्या काही सूचना असतील तर त्या ही तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ईमेल द्वारे लिहून सांगू शकता. धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नव-नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी उजवीकडील खालील बाजूस असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *